(अ) प्रवर्तक
सर्व वाणिज्यिक व रहिवास स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक आहे, खाली उल्लेखिलेले प्रकल्प सोडून :-
- ज्या भूखंड विकासासाठी प्रस्तावित आहे त्याचे क्षेत्रफळ 500 चौरस मिटर पेक्षा अधिक नाही.
- विकसीत करावयाच्या प्रस्तावित सदनिकांची संख्या 8 पेक्षा अधिक नसावी, ( टप्प्या-टप्प्याने बांधावयाच्या इमारतींसह असलेला प्रकल्प) असेल.
- या कायद्याची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी ज्या प्रवर्तकांना बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
- या कायद्याअंतर्गत ज्यांचे नुतणीकरण, दुरुस्ती किंवा पुर्नविकास ज्यामध्ये पणन, जाहीरातीव्दारे विक्री किंवा सदनिका, भूखंड किंवा इमारत यांचे नवीन वाटप करावयाचे नाही.
स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही प्रवर्तक त्यांच्या स्थावर संपदाची किंवा त्यातील भागाची जाहिरात, बाजारातील विक्रीची कार्यवाही, लाभार्थ्याच्या नावे नोंद करुन ठेवणे, विक्री किंवा विक्रीची तयारी दाखवित असेल किंवा भूखंड, सदनिका किंवा इमारत खरेदी करण्यासाठी आमंत्रित करु शकणार नाही. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये ज्या इमारतींना मंजूर आराखड्यानुसार पूर्णत्वाचे प्रमाणत्र किंवा रहिवास योग्य प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा प्रवर्तकांना त्यांच्या स्थावर संपदाची नोंदणी स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे करणे आवश्यक आहे.
प्रवर्तकाला पुरविण्यात येणाऱ्या मुख्य सेवा :-
- प्रकल्पाची नोंदणी
- प्रत्येक प्रकल्पाची माहिती त्रैमासिक पध्दतीने अद्ययावत करणे
- स्थावर संपदा प्रकल्पाचा विस्तार /व्याप्ती वाढविणे
- तक्रार / गाऱ्हाणी स्विकारणे
(ब) स्थावर संपदाचे अभिकर्ता (दलाल) -
स्थावर संपदा (विनियमन व विकास) कायदा, 2016 अंतर्गत मिळकतीच्या विक्रीच्या संदर्भात अभिकर्त्यांने कोणत्याही व्यवहाराची सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करावयाची आहे. नोंदणीची ग्राह्यता पाच वर्षासाठी असेल. त्यानंतर नोंदणीचे नुतनीकरण करता येईल. अभिकर्त्यांसाठी पुढील प्रमाणे सुविधा असतील :-
- अभिकर्त्यांची (दलालांची) नोंदणी
- अभिकर्त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण
- तक्रार / गाऱ्हाणी दाखल करणे
(क) नागरिक
स्थावर संपदा (विनियम व विकास), कायदा 2016 अंतर्गत नागरिकांना पुढील सुविधा उपलब्ध असतील :-
- तक्रार / गाऱ्हाणी दाखल करणे
- नोंदणीकृत प्रकल्पाची सविस्तर व अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
- नोंदणीकृत स्थावर संपदा प्रकल्पासंदर्भात, कोणतीही व्यथीत / बाधीत व्यक्ती, प्राधिकरणाकडे वा प्राधिकरणातील निकाल देणाऱ्या अधिकाऱ्याकडे, या कायद्यातील नियम व विनियमातील तरतूदींचा भग अथवा तरतूदींच्या विरुध्द कृती केल्याच्या संदर्भात तक्रार दाखल करु शकेल