RERA Logo महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ISO 9001:2015 certified
श्री. एकनाथ शिंदे
माननीय मुख्यमंत्री
Maharashtra Chief Minister
Government of India

अटी आणि शर्ती

या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण द्वारे केली जात आहे. या संकेतस्थळावरील माहिती महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण ने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता, असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.

संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.

या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्परिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण जबाबदार असणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरली जाऊ शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण हे दुवे उपलब्ध करून देत

भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.